Aspire Academy Global

Call us Now or SMS: 8805100505

३ दिवसीय एन एल पी आधारित वर्कशॉपचे फायदे

संस्थेसाठी फायदे :-

१) संस्थेतील मानवी पाठबळातील – संभावना, सामर्थ्य ओळखता येणे

२) अशा मनुष्यबळातील कर्तुत्वाची फेर जाणिव, पुर्नशोध लागणे.

३) संस्थेतील सर्व घटक, पातळीवर संभाषणात सुधारणा होणे.

४) संस्थेतील कामकाज संतुलीत व पोषक वातावरण निर्माण करता येणे.

५) ताणतणाव, वादविवाद यांवर ताबा मिळवता येणे.

६) संस्थेची भविष्यकालीन ध्येये व त्यांची पूर्तता याबद्दल स्पष्टता येणे.

७) जास्तीत जास्त फायद्यासाठी, मनुष्यबळाची प्रेरणा वृध्दींगत करता येणे.

८) संस्थेची वाढ व अपेक्षित परिणाम साध्य करता येणे.

सदस्य आणि मनुष्यबळासाठी फायदे :-


१) आपले व्यक्तिगत सामर्थ्य, संभावना व कर्तुत्व यांची जाण होणे.

२) व्यक्तीगत दुबळेपणा, कमीपणा ओळखता येणे, व त्यावर मात करण्यासाठी यशस्वी उपाय योजना करता येणे.

३) भविष्यकालीन ध्येये व त्यांची पूर्तता याबद्दल स्पष्टता येणे.

४) व्यक्तिगत प्रगती आणि स्वत:बद्दल आदर, विश्वास वृध्दींगत होणे.

५) जाणत्या व अजाणत्या मनाची, शक्तीची रचना ओळखता येणे, ज्यामुळे अपेक्षित परिणाम साध्य होणे.

६) कठिण विषय हाताळता येणे.

७) यशासाठी व्यूहरचनेची बांधणी करता येणे आणि अपेक्षित परिणाम साध्य करता येणे.

८) चांगल्या परिणामांसाठी प्रेरणा जोपासता येणे.

९) समजण्याच्या विभिन्न वैयक्तिक पध्दती ओळखता येणे व त्याची जाणिव होणे.

१०) समजावण्याच्या विभिन्न वैयक्तिक जाणिव पध्दती ओळखता येणे.

११) इतरांवर प्रभाव, छाप पाडण्यासाठी भाषेचा प्रभावी वापर करता येणे.

१२) संभाषण कौशल्य वाढवणे.

१३) सहकारी, सहचारी वर्गाबरोबर स्पर्धेत यशस्वी होता येणे.

१४) संस्थेच्या अपेक्षा पूर्ण करता येणे व याची क्षमता वाढवता येणे.

३ दिवसीय सत्रात काय शिकाल ?


१) एन् एल् पी चा इतिहास व माहिती.

२) एन् एल् पी चा पाया व मूलभूत तत्वे जाणणे.

३) संभाषण कौशल्यात उत्कृष्ठता आणणे.

४) फक्त ध्येय, उद्दीष्टे न ठरवता,त्याहूनही पुढे ती मिळवता येण्याचा, साधनेचा मार्ग स्विकारणे.

५) प्रश्नोत्तरे, सवाल विचारण्याचे सामर्थ्य व फायदे समजणे, ज्यामुळे संभाषणात प्रभाव पडणे.

६) शाब्दीक व हावभावातील संभाषण कौशल्य सुधारत प्रभावी नाते-संबंध जोपासता येणे.

७) स्वत: व इतरांच्या वैयक्तिक भावनिक प्रतिक्रिया, प्रतिसाद ओळखता येणे, त्यावर ताबा मिळवणे आणि त्यांचे सुनियोजन करता येणे.

८) परस्पर संबंधातील ताणतणाव, वादविवाद कमी करता येणे व त्यावर नियोजन करता येणे.

९) व्यवहारातील, संभाषणातील बदलणारी, प्रमाणे–रचना समजणे आणि जाणिवतेत सुधारणा आल्याने अडचणी/ मुद्दयांवर निदान करता येणे.

१०) भविष्यातील घटनांसाठी पूर्वतयारी, पूर्वनियोजन करता येणे- एक संपूर्णत: आगळी वेगळी तयारी.

११) आणि वैयक्तिक योजनांची, बदलांची आखणी कारण......
‘‘बदलांशिवाय’’ बदल होत नाही…!!

Go to top of page